प्रेम आनंद चिदानंद भय

संसार,माया,जग,विश्व,आकांशा,इच्छा,हे सगळे मंडळी एकाच व्याख्येत येतील का?नसो वा असो ते महत्वाचे नाही त्यातील मर्म किंवा त्यात राहून जगणे अर्थात उत्कृष्ठ हे कोण कितपत योग्य करतो ह्यावर सगळे अवलंबून आहे•मनुष्य एकमेकांवर,नातेवाईकांवर,
उत्तम भौतिक गोष्टीवर,स्वतःला आदर,इज्जत,ह्या गोष्टी वर खूप अतोनात प्रेम करतो•त्यागोष्टी मिळवण्यासाठी तो पूर्ण आयुष्य त्याचे कष्ट,शक्ती,बुद्धी,पैसा सर्व खर्च करतो आणि मिळवतो की नाही की फक्त क्षणिक मिळवतो चिदानंद त्याला त्यातून भेटतो का नाही की फक्त क्षणभंगुर वेळेसाठी तो हे मिळवतो?वाद खूप मोठा होईल आपल्या मुख्य मुद्द्या कडे येऊ• 
उदाहरण -एक पती आपल्या पत्नीवर ह्यासाठी प्रेम नाही करत की ती खूप चांगली आहे तो ह्यासाठी पत्नी वर प्रेम करतो की तो स्वतःवर खूप प्रेम करतो• एक पत्नी आपल्या पतीवर ह्यासाठी खूप प्रेम करते की ती स्वतःवर खूप प्रेम करते•मनुष्य संसारवर ह्या जगावर ह्यासाठी प्रेम नाही करत की हे जग खूप चांगले आहे ह्यासाठी प्रेम करतो की स्वतःवर सगळ्यात जास्त प्रेम करतो•मनुष्य त्याच गोष्टीवर प्रेम करतो की ज्यातून त्याला सर्वात जास्त आनंद मिळतो•हे त्रिकालाबाधित सत्य आहे• असो त्यापलीकडे जरा जाऊ,ह्याच गोष्टी मिळवण्यासाठी तो सर्व खर्च करतो आणि आनंद घेतो(क्षणिक)•स्वतःला आनंद मिळवून देणाऱ्या सर्व गोष्टीवर मनुष्य प्रेम करतो कारण तो स्वतःवर सर्वात जास्त प्रेम करतो😊•
मनुष्य त्या गोष्टी वर प्रेम करत नाही ज्यातून दुःख मिळते तेही क्षणिक च असते हेच त्याला कळत नाही किती विटंबना आहे सुख आणि दुःख हे क्षणिक,माया असून पण मनुष्य आनंद देणाऱ्या गोष्टीवरच प्रेम करतो•दुःख देणारे नातेवाईक,मंडळी,पद,मनुष्य,भौतिक गोष्टी,काही सत्य वचन,जरी सत्य असले आणि त्यातून दुःख मिळत असेल तर मनुष्य कधीही त्यावर प्रेम करत नाही•
आता स्वतःवर प्रेम करणे त्यातून आनंद मिळतो तोच खरा आनंद आहे का तोच आहे का चिदानंद?की त्याच्या पलीकडे ही काही आहे जिथे मनुष्य ला कसलेच भय नाही 
भय-मनुष्य जे आहे किंवा नाही त्याला भितो ,आभासी आहे,असू शकते,जे मिळवलंय,मिळवायचंय,ह्या सर्व गोष्टी ला तो भितो•मग ह्याच्यापलिकडे जीथे आनंद,प्रेम,भय दुःख ह्यापैकी एकही गोष्ट नाही तोच खरा चिदानंद आहे मित्रांनो•जिथे ह्याच्यापलीकडे सर्व गोष्टी आहे तेथे स्व ची ओळख आहे तेथेच मनुष्य ला चिदानंद आहे•त्याच गोष्टी साठी ऋषी मुनी काळोख्या अरण्यात हिंडले?गौतम बुद्ध नि त्याच गोष्टी साठी राज्य,संसार,पत्नी,त्याग केला?भक्त प्रल्हादाने भक्ती केली?पैयगंबर नि संदेश दिला?शबरी नि बोरे आणली?बाबा आमटे नि सेवा कृष्ठरोग्याची केली?महावीरांनी पंचशील सांगितले? सिंधुताई सपकाळ शेकडोंच्या आई झाल्या?


Comments

  1. Very nicely written 💐💐👌👌

    ReplyDelete
  2. Kya baat ..kya baat ..kya baat...only truth 👌👌🙏

    ReplyDelete
  3. खूप छान सर, खरा आनंद कशात आहे हे तुम्ही तुमच्या लेखातून मानव जातीला एक चांगला संदेश दिला.

    ReplyDelete
  4. Pawar saheb khup chan ahe mast

    ReplyDelete
  5. Pawar Saheb khup chan....

    ReplyDelete

Post a Comment