भरपूर महान,बुद्धिजीवी,युगप्रवर्तक माणसांच्या एका टप्प्यातील विचारांमध्ये एक स्तिरत्व येते.यांच्यानुसार एक असा क्षण आयुष्य आणते अथवा ते घडवून आणतात जिथे आतापर्यंत शिकलेले सर्व ज्ञान,अनुभव,विद्या,कमी वाटू लागतात.
त्यांना हे विश्व एकदम नवे वाटू लागते.आत्तापर्यंत ची शिक्षा खोटी आणि तर्कहीन ठरते.
ह्या जगाला ते नव्याने समजण्याचा प्रयत्न चालू करतात.आपल्या आपल्या पद्धतीने,नेटाने,आजपावोत च्या संघर्षाने ते हा प्रयत्न पद्धतशीर चालू ठेवतात.हेच त्यांचे अंतिम ध्येय,कार्य उरलेले असते कदाचित.
त्यात ते आपल्या आपल्या धर्म,दर्शन विज्ञान,संस्कृती,परंपरा,बौद्धिक पातळी,इच्छाशक्ती,आणि शेवटी बनलेले वातावरण ह्यानुसार ते ह्या गोष्टि परत समजून घेऊ पाहता.आता आधी प्राचीन संस्कृती आणि नंतर सध्या चालू असलेले त्यांचे प्रयत्न दोन्ही क्रमाने समजून घेऊ काय रहस्य तरी काय आहे????
1--- भक्ती,कर्म,यात्रा,सन्यास,अशा नानाविध मार्गाने जाऊन त्या परमतत्व मध्ये विलीन होण्याचा दावा करतात.एक वेळी भक्ताची ताकद ही तो भक्ती करणाऱ्या देवापेक्षा ही जास्त होते,कर्म योग तर राज योग आहे,राहिले दुसरे दोन प्रकार तर त्यांचा अनुभव फार वेगळा आणि संथ आहे बाकी पहिल्या दोन पैकी.कोणी दान करतो आता ते पैसे च असले पाहिजे असे नाही तुमच्या भावना पण दान करता येतात,दानाचे इथपर्यंत विश्रुत क्षेत्र आहे.एखाद्याविषयी चांगले बोलणे,त्याला वेळ देणे हे पण दानामध्ये आले. हा प्रकार काही आपल्या नवीन पिढीला समजणार नाही म्हणून आत्ता चालु जागात येऊ😆
2---हे खुप महत्वाचे आणि चालू जगात घडणारे आहे .
आता हेच लोग वरील तत्वाच्या जरा अलीकडील पायरी कडे आले आहेत त्यात कर्म म्हणजे मला पैसा कमवायचा आहे मग मार्ग कोणताही असो माझा परिवार सुखी झाला पाहिजे.वाईट कर्म करायला पण मेहनत लागते असा तर्क हे महाशय देतात हल्ली.मग परिवार सुखी ठेवावे कर्तव्य आहे त्या नावाखाली हे सर्व खपवतात.पण त्यांच्या पापात तोच परिवार भागीदार नाही हे ह्यांना कळणार नाही.ते फक्त तुमच्या सुखात आणि दुःखात भागीदार असू शकतात.
दुसरीकडे फक्त एक संगीत,व्यायाम,कला (कोणतीही अर्थात अनेक प्रकारमधील),ह्यात झोकून त्यातच आमचा स्वर्ग आहे म्हणनारे पण आहेत.त्यात पण कार्य करताना असलेली नैतिकता किती पाळली जाते कोणास ठाऊक??
नंतर फक्त आम्ही आमचे सुखी ह्याच जन्मासाठी वाले पण पावती घेऊन येतात,त्याच्यावर शिक्का अर्थात त्यांचाच.फक्त जगणे इहलोक च बाकी शुन्य असे मग त्यात आनंद देणाऱ्या (अर्थात पंचइंद्रियला)त्यातून येणाऱ्या थोडासा क्षणिक मानसिक आनंदासाठी सर्व एक केले जाते.त्यातून होणारीअनुभूती ही काही दिवस वा एखादी फक्त मारणपर्यंत आठवणीत राहते???पुढे काय हा प्रश्न येतो?????
माणसामध्ये असणाऱ्या अविनाशी चैतन्यतुन ऊर्जा पंचइंद्रियला मिळते तिथून मनुष्य सगळ्या सुखाची,दुःखाची भावनांची अनुभूती घेतो पण अविनाशी चैतन्यतून पलीकडे पाहत नाही??
आपले डोळ्या मध्ये दृष्टी आहे त्याने आपण सगळे जग पाहतो पण ज्यांनी दृष्टी दिली त्याला आपण त्या दृष्टी मधून नाही पाहू शकत कारण त्या डोळ्याची शक्ती सीमित आहे त्याला आपण फक्त आपल्या अविनाशी चैत्यतून च अनुभवू शकतो.

Very informative and nicely drafted 💐
ReplyDeleteविसर पडलेल्या लोकाना खूप महत्वचा संदेश दिला. सर
ReplyDeleteVery nice pawar saheb
ReplyDeleteNice
ReplyDeleteखरी परिस्थिती साहेब 👌
ReplyDeleteखूप छान सरजी,मस्त
ReplyDeleteProperly explained ...nice thought 👏👌
ReplyDeleteNice, saheb
ReplyDelete